नवी दिल्ली- मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधू मिस यूएसए 2019 चेस्ली क्रिस्टच्या आकस्मिक निधनाबद्दलची बातमी ऐकून दु:खी झाली आहे. ३० वर्षीय ब्युटी क्वीन, वकील, फॅशन ब्लॉगर आणि एक्स्ट्रा टीव्ही वार्ताहर असलेली चेस्ली क्रिस्ट रविवारी ३० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता न्यूयॉर्क शहरातील ६० मजली कॉन्डोमिनियमच्या उंच इमारतीवरुन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाल्याचे एनवायपीडीच्या प्रवक्त्याने सांगितले.
सोमवारी हरनाझने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती इस्रायलच्या इलात येथे झालेल्या 70 व्या मिस युनिव्हर्स 2021 मधील विजयानंतरचा क्षण चेस्लीसोबत हसत शेअर करताना दिसते. पुढे तिने लिहिलंय, "हे हृदयद्रावक आणि अविश्वसनीय आहे, तू नेहमीच अनेकांसाठी प्रेरणास्थान होतीस. रेस्ट इन पीस चेस्ली."
वृत्तानुसार, NYPD ने शेअर केले आहे की नवव्या मजल्यावर राहणाऱ्या क्रिस्टचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचे दिसत आहे आणि वैद्यकीय परीक्षकांनी अद्याप अधिकृत कारण निश्चित केलेले नाही.