मुंबई- मिस युनिव्हर्स 2021 ( Miss Universe 2021) चा किताब जिंकून हरनाझ संधू (Harnaaz Sandhu) भारतात परतली आहे. गुरुवारी सकाळी ती मुंबई विमानतळावर पोहोचली. जिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तेव्हाच ओमिक्रॉन प्रकाराचा धोका लक्षात घेता मुंबई आरोग्य विभागाच्या पथकाने संधूचे नमुने घेतले आणि तिला 7 दिवसांसाठी मुंबईतील स्टार हॉटेलमध्ये क्वारंटाईनसाठी पाठवले आहे.
हरनाझ संधू कोरोनाच्या नियमानुसार क्वारंटाईन
आरोग्य विभागाने विश्वसुंदरी संधू हिला मुंबईतील एका सात तारांकित हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले आहे. या ठिकाणी अहवाल आल्यानंतर तिला 7 दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. याप्रकरणी हरनाजचा भाऊ हरनूर याने मीडियाला सांगितले की, साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव पाहता आरोग्य विभागाने हरनाझला कोरोनाच्या नियमानुसार क्वारंटाईन केले आहे.
विश्वसुंदरीचे घरी जाणे लांबणीवर
सध्या हरनाझचे होम टाऊन चंदीगडला जाण्याचा कोणताही कार्यक्रम नाही. कारण तिला ७ दिवस मुंबईत क्वारंटाईन करावे लागणार आहे, अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यक्रम निश्चित होईल. खरार, मोहाली येथील रहिवासी हरनाझ संधू इस्रायलमध्ये पार पडलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत विजेती ठरली आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई आरोग्य विभागाच्या टीमने मिस युनिव्हर्स हरनाझला क्वारंटाईन केले आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा ( Omicron variant ) धोका लक्षात घेऊन सरकारने त्यानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर तपासणी होईल व अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.
हेही वाचा - Miss Universe 2021 In Mumbai : 'मिस युनिव्हर्स' हरनाझ संधू मायदेशी परतली, मुंबईत जोरदार स्वागत