मुंबई - अभिनेत्री-मॉडेल मिलिंद सोमण यांची पत्नी अंकिता कोंवर यांनी ईशान्येकडील लोकांवरील जातीय भेदभावाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूचे रौप्य पदक मिळवल्यानंतर काही 'ढोंगी' लोकांकडून आनंद साजरा केला जातोय, हे लोक जातीय भेदभाव बाळगणारे असल्याचे अंकिता यांनी म्हटलंय.
अंकिता या गुवाहटीच्या रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय, "जर तुम्ही ईशान्य भारतीय असाल आणि तुम्ही जेव्हा देशासाठी पदक जिंकता तेव्हाच तुम्ही भारतीय असता. नाहीतर तुमची ओळख 'चिंकी', 'चायनीस', 'नेपाळी' किंवा नवीन भर 'कोरोना' अशी असते. भारतात केवळ जातीयवादच नाही तर वंशवादही आहे. अनुभवातुन बोलत आहे, # हायपोक्रिट्स."
कोंवर यांच्या पोस्टवर नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्यांच्या अनुभवाशी सहमती दाखवली आहे तर काहींना हे थोडे जास्त वाटत आहे.