मुंबई - मॉडेल अभिनेता मिलींद सोमनने 'मेड इन इंडिया' या पुस्तकामध्ये लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जात असल्याचा उल्लेख केलाय.
सोमनने स्थानिक शाखेतील ट्रेनिंगबद्दल सांगितले. आरएसएसची शाखा शिवाजी पार्कमध्ये भरत असे. त्याचे वडिल आरएसएसवर खूप विश्वास ठेवत असत. त्यांचे म्हणणे होते की, ज्युनियर केडरच्या रुपात तरुण मुले शिस्तबध्द , फिजीकली फिट आणि योग्य विचार शिकू शकतात.
मिलींदला असे वाटते की, त्याचे शाखेत जाणे केवळ ती शाखा शिवाजी पार्कमध्ये भरते यासाठी होते.
मिलींद सोमनने पुढे लिहिलंय की, आज जेव्हा आरएसएस शाखेंचे सामुदायिक प्रपोगंडा, मीडियाची तीव्र टीका आणि इतर विरोधी गोष्टी ऐकतो तेव्हा चकित व्हायला होते. त्याकाळातील शाखा एकदम वेगळी असायची असेही सोनमने मत नोंदवले आहे.
मिलींद सोमनने खाकी चड्डी घालून संचलन करणे, कँपिंग ट्रिप्स, गाणी आणि न कळणाऱ्या संस्कृत भाषेतील गोष्टी यांचाही उल्लेख केलाय.
हा सर्व उपक्रम एका टीमच्या देखरेखीखाली पार पडायचा. त्यात कोणी प्रेरणा देणारे नसायचे मात्र यामुळे चांगल्या नागरिक सैनिकांचा विकास होतोय असे मानले जायचे.
मीडिया रिपोर्टनुसार मिलींद सोमनचे वडिल आरएसएसशी संबंधित होते आणि एक गौरवशाली हिंदू होते. मिलींदने याचा उल्लेख 'मेड इन इंडिया'च्या अंकात करताना लिहिलंय, ''यात गर्व वाटण्यासारखे काय आहे हे मला समजत नाही, पण दुसरीकडे तक्रार करण्यासारखीही कोणती गोष्ट नाही.''