महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गायक मिका सिंगच्या मॅनेजरची रेकॉर्डिंग स्टुडिओत आत्महत्या - Mika Singh Manager Soumya comitted Suicide

अंधेरी पश्चिम येथील रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मिका सिंगची मॅनेजर सौम्या हिने झोपेच्या अधिक गोळ्या घेऊन आत्महत्या केली आहे.

Mika Singh Manager Soumya comitted Suicide in Recording studio
गायक मिका सिंगच्या मॅनेजरची रेकॉर्डिंग स्टुडिओत आत्महत्या

By

Published : Feb 21, 2020, 11:01 PM IST

मुंबई - सुप्रसिद्ध गायक मिका सिंगची मॅनेजर सौम्या हिने अंधेरी पश्चिम येथील रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती मिका सिंगची मॅनेजर म्हणून काम पाहत होती.

गुरुवारी रात्री सौम्याने झोपेच्या अधिक गोळ्या घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तिचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी पंजाब येथे तिच्या आजी-आजोबांकडे पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details