महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

टीव्हीच्या इतिहासात पहिल्यादा 'मी होणार सुपरस्टार' रिएलिटी शोचा होणार ग्रँड प्रीमियर - Mi Honar Superstaron Star Pravah

स्टार प्रवाहवर १२ जानेवारी पासून नवा सिंगिंग रिऍलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार’चा ग्रॅण्ड प्रीमियर होणार आहे’. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच मिका सिंग, शान, सुखविंदर सिंग, उदित नारायण, शाल्मली खोलगडे आणि नकाश अझीझ हे भारताचे सुपर सिंगर्स पहिल्यांदाच एकत्र दिसतील.

Mi Honar Superstar Grand Premier
'मी होणार सुपरस्टार' रिएलिटी शोचा होणार ग्रँड प्रीमियर

By

Published : Jan 13, 2020, 2:44 PM IST

गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना ‘मी होणार सुपरस्टार’ या शोद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. १२ जानेवारीला दुपारी १२ वाजल्यापासून हा ग्रँड सोहळा अनुभवता येईल. आदर्श शिंदे, राहूल देशपांडे, मृणाल कुलकर्णी हा शो जज करत असून पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. दिग्गजांचे जबरदस्त परफॉर्मन्सेस आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शोधलेलं अफलातून टॅलेण्ट असा सुरेख मेळ या शोच्या निमित्ताने जुळुन आलाय. दर शनिवार आणि रविवारी ९ वाजता ‘मी होणार सुपरस्टार’ हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘टॅलेण्ट ही अशी गोष्ट आहे ज्याचा कधीही विसर पडत नाही. काही जणांना मात्र आर्थिक परिस्थितीमुळे, घरच्यांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे आणि अश्या बऱ्याच कारणांमुळे आपलं स्वप्न पूर्ण करता येत नाही. स्टार प्रवाहवर सुरु होणारा मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम अश्याच स्पर्धकांना दुसरी संधी देणार आहे ज्यांचं गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. संगीत क्षेत्रातले दिग्गज हा कार्यक्रम जज करणार आहेत त्यामुळे स्पर्धकांचं स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरणार आहे. आयुष्यात कधीना कधी दुसरी संधी ही मिळतेच. गाण्याचं स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या स्पर्धकांसाठी मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम हीच संधी घेऊन आला आहे.’

‘मी होणार सुपरस्टार’च्या मंचावरचा अनुभव सांगताना सुप्रसिद्ध गायक शान म्हणाला, ‘मराठी भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे आणी ती बोलताना खूप आपलेपणा जाणवतो. शाळेत असताना माझा मराठी हा आवडता विषय होता आणि इतर विषयांपेक्षा सर्वात जास्त मार्क्स मला मराठीमध्ये मिळायचे. स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या शोच्या पहिल्या एपिसोड साठी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी लगेच होकार दिला. या मंचावर मी मराठी गाणीही गायली आहेत. खास बात म्हणजे शोची संकल्पना मला खूपच भावली. आयुष्यात सेकंड चान्स खूप कमी जणांना भेटतो. त्यामुळे या कार्यक्रमातून देण्यात आलेल्या संधीचा स्पर्धकांनी पुरेपूर फायदा उठवायला हवा. माझ्या बाबतीत सेकंड चान्सचा किस्सा सांगायचा तर मला लहानपणापासून गाण्याची खूप आवड. मी जिंगल्स ही गायचो मात्र वयाच्या १२ व्या वर्षी माझा आवाज बदलला. तो पूर्वीसारखा होणार नाही असंच मला वाटलं... दोन तीन वर्षांच्या रियाझानंतर मला माझा पूर्वीसारखा आवाज परत मिळाला. ही गोष्ट ऐकून विश्वास बसणार नाही पण आयुष्याने मला दिलेला हा सेकंड चान्सच होता.

मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमाविषयी सांगताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तम कलाकृतीशी जोडले गेल्याचा आनंद आहे. अत्यानंदाचा भाग म्हणजे राहुल देशपांडेचं गायनाचं गुरुकुल आणि आदर्शच्या नव्या शाळेत माझं अध्ययन होणार आहे. स्पर्धकांना नवी उभारी देणारा मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम खूपच स्पेशल असल्याचंही त्यांनी सांगितलं. मृणाल कुलकर्णींचं स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. राजा शिवछत्रपतीमधली त्यांनी साकारलेली जिजाऊ, महाराष्ट्राचं नच बलियेच्या मंचावरची सूत्रसंचालिका आणि आता मी होणार सुपरस्टारची जज हा प्रवास खूप आनंददायी आहे असं मृणाल कुलकर्णी यांना सांगितलं.’

या कार्यक्रमाविषयी राहुल देशपांडे म्हणाले, ‘मी होणार सुपरस्टार नावातच खूप सकारात्मकता आहे. स्टार प्रवाहसोबतचा हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. इतकी छान टीम आहे त्यामुळे काम करायलाही मज्जा येते. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या स्पर्धकांसाठी ‘मी होणार सुपरस्टार’चा मंच दुसरी संधी देणार आहे. महाराष्ट्रातून शोधलेल्या ३० स्पर्धकांपैकी कोणत्या स्पर्धकांची निवड करायची हा खूप मोठा प्रश्न होता. त्यामुळे मनावरती दगड ठेवून आम्ही १५ ऐवजी १६ स्पर्धकांची निवड केली आहे. १६ स्पर्धकांमधील प्रत्येकाच्या आवाजात वेगळेपण आहे. प्रत्येकाची गाण्याची स्टाईलही खूप वेगळी आहे. मला खात्री आहे हे आवाज महाराष्ट्राला आवडल्यावाचून रहाणार नाहीत.’

ABOUT THE AUTHOR

...view details