नवी दिल्ली - नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नापूर्वीचा विधीसोहळा सुरू झाला आहे. आज त्यांच्या हळदीचे आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. हळदीसाठी नेहा पिवळ्या प्लेन साडीमध्ये दिसली आहे, तर रोहनप्रीत पिवळ्या कुर्त्यामध्ये दिसला आहे.
दुसर्या फोटोत नेहा हातावर व पायांवर मेहंदी लावताना दिसत आहे. नेहावर मेहंदी लावण्याची जबाबदारी दिल्लीच्या प्रसिद्ध राजू मेंहदी वाला यांना देण्यात आली आहे.