महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘मी होणार सुपरस्टार’ च्या महाअंतिम सोहळ्यात पिळगांवकर आणि सराफ कुटुंबीयांची खास उपस्थिती! - Sachin-Supriya Pilgaonkar

'मी होणार सुपरस्टार'च्या (Me Honaar Superstar) मंचावर सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांनी उपस्थिती लावली. यांच्या उपस्थितीने महाअंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढली. सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांनी खास गाण्यावर परफॉर्म करत या सोहळ्याची शान वाढवली.

Me Honaar Superstar: Sachin-Supriya Pilgaonkar and Ashok-Nivedita Saraf grace the grand finale
‘मी होणार सुपरस्टार’ च्या महाअंतिम सोहळ्यात पिळगांवकर आणि सराफ कुटुंबीयांची खास उपस्थिती!

By

Published : Nov 25, 2021, 7:50 AM IST

मुंबई - ‘मी होणार सुपरस्टार’ मधून (Me Honaar Superstar) डान्सचा जल्लोष अभिप्रेत केला जात होता आणि आता तो कार्यक्रम समाप्तीच्या मार्गावर आहे. या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा होत असून त्यात जेष्ठ कलाकार सचिन-सुप्रिया पिळगांवकर ( Sachin-Supriya Pilgaonkar) आणि अशोक-निवेदिता सराफ (Ashok-Nivedita Saraf) यांची खास उपस्थिती असणार आहे. प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी हवं असतं एक हक्काचं व्यासपीठ. ज्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. डान्सचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी असाच एक मंच उभारला तो स्टार प्रवाह वाहिनीने.


स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सुरू झालेला एक प्रवास म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार’ यातील डान्सचा जल्लोष आता अंतिम टप्प्यावर आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 60 स्पर्धकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील 4 सर्वोत्तम स्पर्धकांनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे. अप्रतिम नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा लवकरच रंगणार आहे. लायन्स ग्रुप, विजय-चेतन, नेहुल-समीक्षा आणि मायनस थ्री या चार जणांमध्ये महाअंतिम लढत रंगेल. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे.

विशेष म्हणजे सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीने महाअंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे. सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांनी खास गाण्यावर परफॉर्म करत या सोहळ्याची शान वाढवली आहे. तेजश्री प्रधान आणि वैभव तत्ववादी यांचा सुद्धा रोमॅण्टिक अंदाज या सोहळ्यात पाहायला मिळेल. यासोबतच आई कुठे काय करते आणि स्वाभिमान मालिकेतील कलाकरही या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details