मुंबई -अभिनेता आशुतोष भाकरे याने २९ जुलै रोजी आपल्या नांदेड येथील घरी आत्महत्या केली होती. तो काही दिवस नैराश्येतून जात होता. मुंबईत त्याच्यावर उपचारही सुरू होते. लॉकडाऊन काळात तो अभिनेत्री पत्नी मयुरी देशमुखसह नांदेडला आपल्या आई वडिलांच्या घरी आला होता. आता त्याच्या आत्महत्येला दोन आठवडे पूर्ण झालेत. ११ ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस होता. मात्र, तो साजरा करण्यासाठी आशु आज या जगात नाही. याचे दुःख त्याच्या पत्नीला झाले आहे. तिने आशुतोषच्या वाढदिवसाच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यात तिने इन्स्टाग्रामवर एक केकचा फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री मयूरी देशमुखने लिहिलंय,
“आशुडा,
तुझ्या वाढदिवसाला उत्तम केक बनावा यासाठी मी लॉकडाऊनच्या काळात ३० केक बनवले. त्या तीसही केकची पहिली चव तुज चाखली होतीस, पण याची...३० वाढदिवस आधीच साजरे करण्याची तुझी ही पद्धत होती का? तुझ्या प्रियजनांसाठी तू असंख्य प्रश्न अनुत्तरीत सोडले आहेस...
तू ही गोष्ट भ्याडपणातून केलेली नाहीस हे आम्हाला माहिती आहे, तर हे तूझ्या असाहय्यपणातून, डिप्रेशनमुळे आलेल्या मोठ्या संघर्षातून घडले आहे...पण गुणी बाळ माझं ते, आपण त्याच्या पाभव करण्याच्या जवळ पोहोचलो होतो आणि आपण किती काम करीत होतो...प्रत्येक गोष्टीतून थोडे अधिक आवश्यक होते ....
प्रत्येक दिवशी, प्रत्येक सेकंदाला, थोडे अधिक धैर्य, संयम आणि एक दीर्घ निरोगी आनंदी आयुष्याची वाट पाहत होतो...आपल्यासाठी...मला अर्ध्या रस्त्यात सोडल्याबद्दल मी तुझ्यावर रागवावं की जितका वेळ माझ्यासोबत होतास याबद्दल तुझे आभारी असावं? पण यामुळे काय फरक पडतो? तुझ्या आत्म्याचा शांततेने प्रवास व्हावा आणि देवदूतांनी तुला योग्य मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना आम्ही सतत करत आहोत. देवदूतांचे ऐक. आता नेहमीसारखा हट्टीपणा करु नकोस.