पुणे- आपल्या मधुर आवाजाने सगळ्यांच लक्ष वेधणारे पोलीस कर्मचारी आतिष खराडे हे सध्या ट्रेडिंग सॉंग 'मनिके मगे हिते' या गाण्याच्या मराठी व्हर्जनमुळे चर्चेत आले आहेत. मूळ गाणे श्रीलंकन गायिका योहानी हिने गायिले आहे.
नोकरी सांभाळून स्वतःनेच गायकीचा अभ्यास
आपली अंमलदाराची नोकरी सांभाळून गायकीचा अभ्यास, रियाज आणि लिखानसुध्दा आतिष स्वतःच करतात. त्यांना शाळेपासून गाण्याची आवड होती मात्र पोलिसांची नोकरी देखील महत्वाची होती. म्हणून त्यांना प्रोपेशनल गायक होता आले नाही. परंतु पोलीस कामाच्या तणावातून रिलीफ मिळण्यासाठी त्यांनी आपली ही कला जपली. नव्या गाण्यांसोबत ते रॅप गाणीही लिहितात आणि स्वरबध्द करतात. श्रीलंकन गायिका योहानी हिचे 'मनिके मगे हिते' हे गाणे सध्या व्हायरल झाले आहे. अनेक भाषांमधील गायक याचे व्हर्जन बनवताना युट्यूबवर दिसतात. आतिष यांनी मराठी भाषेतून हे बनवून सर्वांनाच चकित केलंय
टेन्शन दूर करण्यासाठी लागली गाण्याची आवड
आपल्या गायनाच्या आवडीबद्दल बोलताना आतिष म्हणाले, की ट्रॅफिकमध्ये काम करत असताना खूप जास्त टेन्शन असत आणि ते टेन्शन दूर करण्यासाठी मी रोज घरी गाणी गात होतो.
आतिष खराडेंनी गायलेले 'मनिके मगे हिते' मराठी गाणे व्हायरल
"मला गाण्याची आवड ही लहानपणापासूनच होती. मी गायलेले गाणी मी सोशल मीडियावर गेल्या २ ते ३ वर्षांपासून टाकायला लागलो. तेव्हापासून तर अधिक आवड निर्माण झाली आहे. लहानपाणी शाळेत गायनाच्या स्पर्धेत भाग घेत होतो. पण त्यानंतर ती आवड तशीच राहिली. पण जेव्हा पोलीस म्हणून नोकरी जॉईन केली तेव्हापासून ही आवड वाढत गेली. कारण ट्रॅफिकमध्ये काम करत असताना खूप जास्त टेन्शन असत आणि ते टेन्शन दूर करण्यासाठी मी रोज घरी गाणी गात होतो. त्यातून माझी आवड वाढतच गेली. कुठेही न शिकता मी घरीच प्रॅक्टिस करायचो. त्यातुन मी रोमँटिक गाणी गाऊ लागलो मग आत्ता मी रॅप गाणी देखील गात आहे.", असे ट्रॅफिक अंमलदार आतिष खराडे यांनी सांगितले.
हेही वाचा - शाहरुखच्या पत्नीने शेअर केला आर्यन अबराम बंधू प्रेमाचा आनंदी क्षण