मुंबई- स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंद सोहळा पार पडला. निमित्त होतं ते २०० भागांच्या पुर्ततेचं. या खास प्रसंगी केक कटिंग करत कलाकारांनी आनंद व्यक्त केला.
या मालिकेत अनिताची भूमिका साकारणाऱ्या सारिका निलाटकर यांनी याप्रसंगी आपला आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या मालिकेचे २०० भाग कधी पूर्ण ते झाले कळलंच नाही. या मालिकेच्या निमित्ताने आमचं छान कुटुंब तयार झालंय. प्रत्येकालाच एकमेकांच्या आवडी-निवडी, सवयी माहिती आहेत. पडद्यामागची हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. या मालिकेने यशाचा असाच टप्पा पार करत रहावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.