संगीतक्षेत्रात ‘रॅप’ नावाचा प्रकार रुळू लागला असून अनेक ‘रॅपर’ उदयास आले असून त्यांच्या रॅप गाण्यांना भरपूर प्रसिद्धी मिळत असते. मराठीमध्ये हा संगीतप्रकार प्रसिद्ध करण्यामागे नाव आहे श्रेयश जाधव उर्फ ‘दि किंग जेडी’. ‘किंग जेडी’ अर्थात श्रेयश जाधव नेहमीच संगीतप्रेमींसाठी नवनवीन गाण्यांचा खजिना घेऊन येत असतो. त्याची गाणी नेहमीच अनोखी असतातच आणि ती थिरकायला लावणारी असतात. पहिला मराठी रॅपर म्हणून नावारुपास आलेल्या श्रेयशने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संगीतात वेगवेगळे प्रयोग करणारा श्रेयश आता ‘मैदान मार' हे जोशपूर्ण गाणे घेऊन आला आहे. महाराष्ट्राला शौर्याचा खूप मोठा इतिहास आहे. स्वराज्याची पहिली ठिणगी ही महाराष्ट्रातच पडली. हे गाणे शौर्य आणि देशभक्तीवर आधारित असून तरुणांसाठी प्रेरणा देणारे आहे. या गाण्यात श्रेयश आपल्याला सैनिकी तसेच मर्द मावळ्याच्या वेशात दिसत आहे. जवानाच्या वेशात तो अतिरेक्यांशी सामना करत आहे तर शिवरायांच्या मावळ्याच्या वेषात तो लढवय्येपणाची शिकवण देत आहे.