मुंबई - दरवर्षी होळी आली की, तमाम मराठी मनोरंजनसृष्टीला वेध लागतात ते कलाकारांच्या धुळवडीचे. शिवाजी पार्क किंवा वांद्रे , अंधेरी येथे कलाकारांच्या या धमाकेदार धुळवडीचे आयोजन होते. यंदाचे वर्ष मात्र त्याला अपवाद आहे. कारण करोना व्हायरसचा धसका या कलाकार मंडळींनी घेतला असून या वर्षीचं धुळवड सेलिब्रेशन रद्द करण्यात आलं आहे. काही कलाकार आपल्या घरीच रंगपंचमी साजरी करताना दिसत आहेत.
कोरोना व्हायरसच्या धसक्यामुळे मराठी सेलिब्रिटींचे धुळवडीचे कार्यक्रम रद्द - मराठी सेलिब्रिटीचे धुळवडीचे कार्यक्रम रद्द
मराठी कलाकार दरवर्षी होळीचा सण उत्साहात साजरे करतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या धास्तीने आयोजित करण्यात आलेला रंगपंचमीचा उत्सव रद्द करण्यात आला.
![कोरोना व्हायरसच्या धसक्यामुळे मराठी सेलिब्रिटींचे धुळवडीचे कार्यक्रम रद्द celebrity-cancel-holi-programme](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6358116-thumbnail-3x2-oo.jpg)
सेलिब्रिटीचे धुळवडीचे कार्यक्रम रद्द
मराठी सेलिब्रिटीचे धुळवडीचे कार्यक्रम रद्द
होळीचे रंग उधळताना कोरोना व्हायरसपासून सुरक्षितता बाळगण्याचा सल्ला बॉलिवूडसह मराठी सेलेब्रिटीही सोशल मीडियावरुन देत आहेत.