मुंबई -बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर अदभूत नगरामध्ये करण्यात आले असून त्याचा राजा म्हणून बिग बॉस यांनी संतोष चौधरी म्हणजेच दादूस यांची निवड केली आहे. “स्वर्ग की नरक” या नॉमिनेशन टास्कसाठी त्यांच्यासोबत तीन सल्लागार स्नेहा वाघ, गायत्री दातार आणि विशाल निकम दिले आहेत.
बिग बॉस मराठी सिझन तिसरा मध्ये ‘स्वर्ग की नरक’ मधील ‘संयमाची ऐशी तैशी’! - बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर अदभूत नगरामध्ये करण्यात आले असून त्याचा राजा म्हणून बिग बॉस यांनी संतोष चौधरी म्हणजेच दादूस यांची निवड केली आहे.घरामध्ये सध्या ‘संयमाची ऐशी तैशी’ हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. टास्क दरम्यान गायत्री आणि विकास यांनी तृप्ती देसाईंना खडेबोल सुनावले.
या टास्कमध्ये स्वर्गात उत्कर्ष, तृप्तीताई, मीनल आणि मीरा तर बिग बॉस यांनी दिलेल्या दंडामुळे स्नेहा वाघ, विशाल निकम, गायत्री दातार थेट नॉमिनेट झाले तर नरकामध्ये म्हणजेच या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी जय दुधाणे, आविष्कार दारव्हेकर, विकास पाटील, सोनाली पाटील हे देखील नॉमिनेट झाले. घरामध्ये सध्या ‘संयमाची ऐशी तैशी’ हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. टास्क दरम्यान गायत्री आणि विकास यांनी तृप्तीताईंना खडेबोल सुनावले.
गायत्री म्हणाली, “तृप्तीताईंना तर काहीच नाही येत करता... नुसतं सगळं कॅमेरासाठी करायचं. सगळं biased करायचे. आम्ही राक्षस नाही तुम्ही राक्षस आहात खरंतर तर एक साधा महामेरू बांधता येत नाही, या कसल्या देवदूत ? बांधता पण येत नाही नीट हो ना ? फक्त खोट बोलतात तृप्तीताई. त्या नाही या टीमकडून नाही त्या टीमकडून बरोबर ना?” “संयमची ऐशी तैशी” या कार्यामध्ये एका टीममधील म्हणजेच नरकातील सदस्य स्वर्गातील सदस्यांना कठीण कठीण टास्क देत आहेत असे दिसून येत आहे.
या टास्क दरम्यान सदस्य एकमेकांना खडेबोल बोलताना दिसत आहेत. आज स्नेहा सोनालीला सांगणार आहे “लोटांगण घालत झाडू मारा… थांबायचं नाही, थांबायचं नाही...” आणि सोनाली हे करत असताना विशाल दादूसशी काहीतरी बोलायला आला असताना स्नेहाने त्याला बजावले “ओ तुम्ही मध्ये बोलायचे नाही..”