मुंबई - व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया २०२० स्पर्धा १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. मानसा वाराणसी या वर्षाची विजेती ठरली आहे. तिने मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले आहे. त्याचबरोबर ऑटो रिक्षाचालकाची मुलगी मन्या सिंग फर्स्ट रनर अप व मिस यूपी बनली आहे. तर मनिका श्योकंद सेकंड रनर अप ठरली आहे.
वडिलांच्या रिक्शातून मन्या सिंगची मिरवणूक
खरं तर, मन्या सिंगचे वडील ओमप्रकाश सिंह यांनी मंगळवारी १६ फेब्रुवारी रोजी ऑटो रॅली काढली होती. ज्यामध्ये मन्या तिच्या आईसमवेत उपस्थित होती. यावेळी तिने मिस इंडिया रनर अपचा मुकुट परिधान केला होता. त्या दरम्यान मन्याने आईच्या पायाला स्पर्शही केला. वडिलांच्या ऑटो व्यतिरिक्त अनेक लोकांनी ऑटो रॅलीत सहभाग घेतला. रॅली श्याम नारायण ठाकूर मार्ग येथून ठाकूर गाव आणि कांदिवली पूर्व मुंबई येथे काढण्यात आली.
मन्या सिंगचा खडतर जीवन प्रवास
सर्व आर्थिक अडचणींचा सामना करूनच मन्या सिंगने हे स्थान मिळवले आहे. मन्या सिंगने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की तिचे वडील रिक्षाचालक आहेत. तिच्या आयुष्यात तिला एक मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यांना बर्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. उपाशी राहून अनेक रात्री काढाव्या लागल्या. हिंमत न हारता तिने आपले ध्येय साध्य केले आहे.
दारिद्र्यात जगावे लागले जीवन