अहमदनगर- जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यदने ९ तारखेपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दीपाली सय्यदच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सिने अभिनेत्री मानसी नाईकसह अनेक कलाकारांनी उपोषण स्थळी हजेरी लावली.
लोक पाण्याची भीक मागत आहेत अन् सरकार सेल्फीत मग्न, मानसी नाईकचा महाजनांना टोला - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
मानसी नाईकने दीपालीची भेट घेतली, यावेळी मानसीला अश्रू अनावर झाले. पाणी हा हक्क आहे, मग असं असताना पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ का येते? असा प्रश्न यावेळी मानसीने उपस्थित केला.
मानसी नाईकने दीपालीची भेट घेतली, यावेळी मानसीला अश्रू अनावर झाले. पाणी हा हक्क आहे, मग असं असताना पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ का येते? असा प्रश्न यावेळी मानसीने उपस्थित केला. राज्यात सध्या काही ठिकाणी पूर परिस्थिती आहे तर नेते, मोठे लोक मदत करण्याऐवजी याठिकाणी सेल्फी घेण्यात आणि व्हिडिओ काढण्यात दंग असल्याचं म्हणत तिनं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली.
पाण्यावर सर्वांचा हक्क आहे, मग सरकार कुणाला पाण्यासाठी वंचित कसे ठेवू शकते, असा प्रश्न मानसी नाईकने उपस्थित केला. दीपालीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून एका बहिणीचा हा संघर्ष पाहून डोळ्यात पाणी आल्याची भावना यावेळी तिनं व्यक्त केली.