कोण होणार करोडपतीच्या कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, सातारा या संस्थेला सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी हे या भागात जिंकलेली रक्कम मदत म्हणून देणार आहेत. या आठवड्यात कोण होणार करोडपती च्या कर्मवीर विशेष भागात हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन नावाजलेली नावं हजेरी लावताना दिसतील. मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे ‘कोहोक’ च्या कर्मवीर विशेष भागात एकत्र येणार आहेत.
मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे गेली बरीच वर्ष एकमेकांचे मित्र आहेत आणि त्यांनी शूल या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे 'कोण होणार करोडपती' कर्मवीर विशेषमध्ये येणार आहेत. ‘शूल’ चित्रपटदरम्यानच्या आठवणींना त्यांनी या भागामध्ये उजाळा दिला.