अहमदनगर - महिलांमधे आढळणाऱ्या कॅन्सर विषयी जनजागृती व्हावी, अशा महिलांसाठी उपचाराची नाहीती आणि त्यांचे सकारात्मक प्रबोधन व्हावे यासाठी अहमदनगर कॅन्सर सोसायटी, आनंदीबाई फाऊंडेशन आणि मॅककेअर हॉस्पिटल यांच्या वतीने 'आशेची पालवी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास स्वतः कॅन्सरला सकारात्मक वृत्तीने सामोरे गेलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला उपस्थिती होत्या.
कॅन्सरने मला मृत्यूचे नव्हे तर जगायचे कसे शिकवले; अभिनेत्री मनीषा कोईराला यांचे प्रेरणादायी भाष्य..
महिलांमधे आढळणाऱ्या कॅन्सर विषयी जनजागृती व्हावी यासाठी अहमदनगर कॅन्सर सोसायटी, आनंदीबाई फाऊंडेशन आणि मॅककेअर हॉस्पिटल यांच्या वतीने 'आशेची पालवी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनिषा कोईराला
यावेळी मनीषा कोईराला यांनी धीरगंभीर परिस्थितीत त्यांना कॅन्सर बाबत आलेला अनुभव कथित करताना कुटुंबाने दिलेल्या पाठबळातून आपण कॅन्सरकडे मृत्यू नव्हे तर जगायचे कसे या सकारात्मक दृष्टीने पाहिल्याचे सांगितले.
कार्यक्रमास आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले,धनश्री विखे आदी उपस्थित होत्या.