कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याला ५५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूड स्टारला शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आरोग्यासाठी आणि आयुष्यातल्या सर्व यशांसाठी शुभेच्छा."
त्यांनी किंग खानला 'मोहक भाऊ' म्हटले असून भविष्यातील कामांमध्ये यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल कॉंग्रेसची सत्ता आल्यापासून शाहरुख खान पश्चिम बंगाल सरकारचे अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (केआयएफएफ) बंगालच्या चित्रपटसृष्टीला चालना देण्यासाठी खान यांचे राज्य सरकारसोबत चांगले संबंध आहेत.
राज्याचे नगरविकास व नगरपालिका कार्यमंत्री व कोलकाताचे माजी नगराध्यक्ष फिरहद हकीम यांनीही एसआरकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, "तुमचे आयुष्य आनंदी होवो".