मॉडेल्स, डिझायनर्स, रॅम्प-वॉक आदी मॉडेलिंग विश्वातील गोष्टींबाबत सामान्यांना नेहमीच कुतूहल असते. फॅशन शोज कसे असतात याबाबतीतही त्यांना जाणून घ्यावंसं वाटत असत. एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ दि इअर हा शो त्यांना याबाबतीत जाणून घेण्याची संधी देत आला आहे. वर्षानुवर्षे मॉडेलिंगच्या परंपरेमध्ये बदल झाला आहे. एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ दि इअर सीझन २ त्याची थीम 'अनअपॉलॉजेटिकली यू'च्या माध्यमातून प्रेक्षकांना धाडसी वृत्ती अवलंबण्यास आणि जीवनात कोणत्याही पैलूसंदर्भात टीका होत असताना देखील आपली चुणूक दाखवण्यास आवाहन करेल. पोलिसांपासून राष्ट्रीय स्तरीय बॉक्सर, राज्यस्तरीय स्प्रिंटर, हॉकी खेळाडू ते ट्रान्सवुमन, प्रत्येक क्षेत्रातील फॅशनउत्साही अभूतपूर्व ग्लॅमर व जादू निर्माण करणार आहेत.
शोच्या प्रारंभावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री मलायका अरोरा म्हणाली, "तुम्ही जे कोणी आहात त्याबाबत नि:संदिग्धपणे आत्मविश्वास दाखवणे ही सर्वोत्तम गुणवत्ता आहे आणि प्रत्येक महत्त्वाकांक्षी सुपरमॉडेल या गुणवत्तेचा उपयोग करत शोस्टॉपर बनू शकतो. आजच्या सतत विकसित होणा-या जगात, जे तुम्हाला खरोखरंच इतरांपासून वेगळे ठरवते ते म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व. यंदाचा सीझन स्वत:ला अभिव्यक्त करत रॅम्पवर स्वत:चे गुण दाखवण्याबाबत आहे. आमचे आकर्षक दिवा तगडी स्पर्धा देण्यास आणि त्यांच्या अद्वितीय शैलींमध्ये स्क्रिनवर झळकण्यास सज्ज आहेत.''
सुपरमॉडेल ऑफ दि इअर सीझन २ ब्लोनी, वैशाली एस, वेरंदाह, एसे, मेलोड्रामा, पापा डोण्ट प्रीच, अभिषेक स्टुडिओ व विरशेटे इत्यादी सारख्या तरूण, उत्साही व नाविन्यपूर्ण डिझायनर्सच्या प्रभावी प्रदर्शनासह शोचा स्तर उंचावणार आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये मॉडेलिंग क्षेत्राचे अकॅडेमिक सादरीकरण असेल. मिनी फॅशन वीक्समध्ये थीमॅटिक रॅम्प वॉक्सच्या माध्यमातून डिझाइनरला सादर करण्यात येईल. यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धकांच्या वैविध्यपूर्ण समूहाद्वारे मंचाची शोभा वाढवण्यात येणार आहे. पर्यावरणास अनुकूल फॅशन ही काळाची गरज असल्यामुळे शो डिझायनर अखिल नागपालसोबत नैतिक व स्थिर फॅशन रॅम्प वॉक विभाग देखील दाखविण्यात येईल. यादरम्यान आव्हानात्मक व मनोरंजनपूर्ण टास्क्स, सेगमेंट्स व फोटोशूट्सचे सुरेख संयोजन प्रेक्षकांना व्हिज्युअल पर्वणी देतील.