मुंबई -बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सध्या न्युयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्बेतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. आत्तापर्यंत कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी त्यांची भेट घेतली. नीतू कपूर त्यांचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच लव्हबर्ड्स मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनीदेखील ऋषी कपूर यांची भेट घेतली. त्यांचा फोटोदेखील नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
लव्हबर्ड्स अर्जुन-मलायकाने न्युयॉर्कमध्ये घेतली ऋषी कपूर यांची भेट - neetu kapoor
काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अर्जुनने आपल्या नात्याची अप्रत्यक्षरित्या कबुली दिली आहे. न्युयॉर्कमध्येही ते दोघे सोबत फिरायला गेले होते. तिथेच त्यांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली.
काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अर्जुनने आपल्या नात्याची अप्रत्यक्षरित्या कबुली दिली आहे. न्युयॉर्कमध्येही ते दोघे सोबत फिरायला गेले होते. तिथेच त्यांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये अर्जुन आणि मलायकाचा हात ऋषी कपूर यांनी पकडलेला दिसत आहे. तर, नीतू कपूरदेखील त्यांच्या शेजारी बसलेल्या दिसत आहेत.
मलायकाने अर्जुनच्या वाढदिवशी शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्या दोघांच्या नात्याची आणखी चर्चा पाहायला मिळाली. अलिकडेच एका मुलाखतीत मलायकाने तिला अर्जुन कपूर आवडत असल्याची कबुली दिली होती. तसेच, तिच्या मुलाला त्यांच्या नात्याबद्दल काही अडचण नसल्याचेही तिने सांगितले होते.