महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणार डॉ. श्रीराम लागू पुरस्कार - महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणार डॉ. श्रीराम लागू पुरस्कार

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने एक महत्त्वपूर्ण घोषणा आज केली आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने एका पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

Shriram Lagoo
डॉ. श्रीराम लागू पुरस्कार

By

Published : Mar 2, 2020, 8:20 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने पुरस्कारांची घोषणाकेली आहे. त्यांनी रंगभूमी आणि चित्रपटामध्ये केलेल्या उत्तुंग कामगिरीचा विचार करुन हा निर्णय शासनाने घेतलाय. यामुळे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील रंगकर्मींमध्ये उत्साह संचारु शकतो.

डॉ. श्रीराम लागू यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी १९ डिसेंबर २०१९ ला निधन झाले होते. मराठी रंगभूमीवर त्यांनी आपल्या अभिनयाने एक वेगळी छाप उमटवली. अत्यंत अभ्यासू आणि शिस्तप्रिय कलाकार अशी त्यांची ओळख होती.

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ ला सातारा येथे झाला. मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच १९६९ मध्ये त्यांनी नाट्य कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांच्या पत्नी दिपा लागू यादेखील टीव्ही अभिनेत्री होत्या.श्रीराम लागू यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. १०० हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.

१९७८ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘नटसम्राट’ नाटकातली अप्पासाहेब बेलवलकर ही त्यांची भूमिका विशेष गाजली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details