महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कॉमेडीचा ‘डबल’ डोस, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'आता आठवड्यातून ४ दिवस!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला महाराष्ट्रातून तुफान पाठिंबा मिळतोय व तो विनोदी कार्यक्रमांच्या यादीत लोकप्रियतेत अव्वल नंबरवर आहे. दर आठवड्याला दोन दिवस प्रदर्शित होणार हा कार्यक्रम आता आठवड्यातून चार दिवस दिसणार आहे.

maharashrachi-hasya-jatra
'महाराष्ट्राची हास्यजत्रा

By

Published : Mar 12, 2021, 6:13 PM IST

मुंबई - ‘जो बिकता हैं वही दिखता हैं’ ही हिंदीतली म्हण सर्वच टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांना लागू पडते. टीआरपी नाही म्हणून अनेक प्रोग्रॅम्स एका रात्रीत बंद केले जातात. त्याच्या उलट जे कार्यक्रम प्रेक्षकांचा पाठिंबा मिळवितात त्यांना एक्सटेन्शन्स आदी मिळतात. सोनी मराठी वरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला महाराष्ट्रातून तुफान पाठिंबा मिळतोय व तो विनोदी कार्यक्रमांच्या यादीत लोकप्रियतेत अव्वल नंबरवर आहे. दर आठवड्याला दोन दिवस प्रदर्शित होणार हा कार्यक्रम आता आठवड्यातून चार दिवस दिसणार आहे. कोवीड काळात अस्वस्थ असलेल्या लोकांना, रुग्णांना, कोवीड योद्ध्यांना, डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस अशा अनेकांना या कार्यक्रमानी दोन घटका रमवलं, हसवलं. या कार्यक्रमामुळे त्यांना काही क्षण आपल्या त्रासाचा, दुःखाचा, वेदनेचा विसर पडला आणि हे या कार्यक्रमाचं हे खूप मोठं यश आहे.

नुकतेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने ३०० भाग पूर्ण केलेत. ही ‘हास्यजत्रा’ सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरली आहे. या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे आणि त्यांच्या आग्रहाखातर आता ही हास्यजत्रा आठवड्यातले चार दिवस म्हणजे सोमवार ते गुरुवार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कॉमेडीच्या या चौकारानं प्रेक्षकांचं टेन्शन नक्कीच तडीपार होणार, हे नक्की. दोन दिवस हास्यजत्रा पाहून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन व्हायचं आणि आता ते ‘डबल’ होणार असून ही टेन्शनवरची ही मात्रा आता ४ दिवस मिळणार आहे.

नव्या-जुन्या विनोदवीरांच्या एकत्रित सादरीकरणानी यातल्या सर्वच कलाकारांना आणि विनोदवीरांच्या सर्व जोड्यांना महाराष्ट्रानी डोक्यावर घेतलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरुवातीलाच समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव ह्या अफलातून विनोदवीरांच्या दोन जोड्या महाराष्ट्राला मिळाल्या. अरुण कदम, पंढरीनाथ कांबळे, प्रभाकर मोरे ह्या अनुभवी विनोदवीरांबरोबर गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार भोजने, श्यामसुंदर राजपूत, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने, दत्तू मोरे, निमिष कुलकर्णी हे सर्व कलाकार आज मराठी रसिकांचे लाडके झाले आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

ABOUT THE AUTHOR

...view details