मुंबई- क्रिकेट मध्ये ‘सेंच्युरी’ ला महत्व असते त्याचप्रमाणे टेलिव्हिजन मालिकांनाही. जितके जास्त ‘शेकडे’ मालिकेच्या नावावर, तितकी जास्त ती लोकप्रिय हा साधा फॉर्म्युला आहे. नुकतेच 'एक महानायक डॉ. बी.आर.आंबेडकर' या मालिकेने नाबाद त्रिशतक मारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित या मालिकेने ३०० भाग पूर्ण केले आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये सुरू झालेली अँड टीव्हीवरील मालिका 'एक महानायक डॉ. बी.आर.आंबेडकर' लक्षवेधक पटकथेसह प्रतिभावान स्टार कलाकारांमुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे.
लाखो भारतीयांची मने जिंकली
‘एक महानायक डॉ. बी.आर.आंबेडकर' या मालिकेने हिंदी जीईसीमध्ये पहिल्यांदाच भारताचे सर्वात प्रेरणादायी नेते डॉ. बी.आर.आंबेडकर यांची अभूतपूर्व जीवनकथा सादर करत लाखो भारतीयांची मने जिंकली आहेत. या मालिकेच्या ३०० व्या एपिसोडमध्ये डॉ. आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा लढा पाहायला मिळण्यासोबत 'पढाई मेरा अधिकार है और पढाना शिक्षक का कर्तव्य है' हे तत्त्व पाहायला मिळेल. हा एपिसोड प्रेक्षकांना बाबासाहेबांचे मूलभूत तत्त्व, शिक्षणाचा अधिकार आणि शिक्षणामध्ये समानता यांची आठवण करून देईल.
सर्व वडिलांसाठी उत्तम प्रेरणास्रोत
जगन्नाथ निवंगुणे ऊर्फ रामजी सकपाळ म्हणाले, ''रामजींची भूमिका साकारताना मला देशाच्या विविध भागांमधील प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम, लोकप्रियता व प्रशंसा मिळाली आहे. ही मालिका प्रबळ कथानक व नेटक्या पात्रांसह नवीन बेंचमार्क्स स्थापित करत आहे. प्रत्येक सुवर्ण टप्पा आमच्यासाठी अभिमानास्पद व प्रशंसनीय क्षण आहे. सर्व संकटांदरम्यान भीमरावांना रामजी यांच्याकडून मिळालेला पाठिंबा व सहाय्य अपवादात्मक होते आणि ते त्यांच्या मुलाची काळजी घेण्याप्रती खूपच कटिबद्ध होते. मला 'एक महानायक डॉ. बी.आर.आंबेडकर'च्या प्रतिभावान टीमचा भाग असण्याचा आनंद होत आहे. रामजींच्या भूमिकेमुळे मी एक कलाकार म्हणून सर्वसमावशेक बनलो आहे आणि माझ्या करिअरसाठी ही भूमिका खूपच खास राहिली आहे. ही भूमिका सर्व वडिलांसाठी उत्तम प्रेरणास्रोत आहे.”
प्रेरणादायी नेत्याच्या तरूणपणाची भूमिका साकारण्याचा अभिमान