मुंबई - अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेणे यांच्या आगामी मराठी प्रॉडक्शन '१५ ऑगस्ट'चे रिलीज २९ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे. अर्थपूर्ण चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेला यामुळे सुरुवात झाल्याचे माधुरीने म्हटले आहे.
माधुरी म्हणाली, "मला नेहमीच अर्थपूर्ण चित्रपट बनवण्याची इच्छा होती. यासाठी '१५ ऑगस्ट' या सिनेमाहून अधिक चांगली सुरुवात कोणतीच असू शकत नाही."
माधुरी म्हणाली, "या चित्रपटाच्या सुंदर कथेला प्रेक्षक स्वतःशी जोडून पाहतील. यामध्ये प्रतिभावंत कलाकार स्वप्नील जयकर, अभिनेता राहुल पेठे, मृण्मयी देशपांडे आणि आदिनाथ कोठारे यांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे."
मुंबईतील चाळीची ही कथा आहे. रहिवासी १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिवस साजरा करण्याची तयारी करतात, परंतु त्याचवेळी अनेक दुर्घटाना घडतात.
कॉलनीत राहणाऱ्या लोकांना स्वतंत्रता, प्रेम आणि स्नेह या शब्दाबद्दल काय महत्त्व आहे हे यात अधोरेखीत करण्यात आले आहे.