मुंबई - निर्माती एकता कपूर हिच्या आगामी"M.O.M - Mission Over Mars" या वेब मालिकेचे पोस्टर तिने सोशल मीडियावर शेअर केले. यात एक रशियन पध्दतीचे रॉकेट दाखवण्यात आले आहे. मात्र याला ट्रोलर्सनी आपल्या निशाण्यावर घेत टीका सुरू केली.
"M.O.M Mission Over Mars" : एकता कपूरने ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर - Mission Over Mars
एकता कपूरने आगामी "M.O.M Mission Over Mars"या वेब मालिकेचे पोस्टर शेअर केले. मात्र तिला ट्रोल करण्यात आलेय याचे सडेतोड उत्तर तिने दिले आहे.
एकता कपूरने ट्रोलर्सना दिले उत्तर
यानंतर एकताने याचा जवाब देत म्हटले की, इस्रोचे रॉकेट वापरणे कायद्याने शक्य नाही. त्यावर अनेक बंधने आहेत. याबद्दल खाली दिलेले डिस्क्लेमियर वाचायची तसदी घ्या, असेही एकताने म्हटलंय.
एकताने शेअर केलेल्या रॉकेटवर भारतीय झेंडाही दिसत आहे. अल्ट बालाजीच्या या आगामी वेब सिरीजमध्ये चार भारतीय महिला वैज्ञानिकांना दाखवण्यात आले. मंगळावर जाण्याच्या मिशनमध्ये काम करणाऱ्या या चार आंतराळ महिला वैज्ञानिकांची "M.O.M -Mission Over Mars" कथा आहे.