महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘फक्त मराठी वाहिनी'वर ‘लॉकडाऊन स्पेशल चित्रपट महोत्सव’! - लॉकडाऊन स्पेशल चित्रपट महोत्सव फक्त मराठी वाहिनी

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या दर्जेदार मराठी सुपरहिट चित्रपटांची मेजवानी संपूर्ण मे महिन्यात 'फक्त मराठी वाहिनी' च्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वाहिनीने प्रेक्षकांसाठी लॉकडाऊन स्पेशल चित्रपट महोत्सव सुरू केला आहे.

Fakta Marathi Lockdown Special Film Festival news
फक्त मराठी लॉकडाऊन स्पेशल चित्रपट महोत्सव

By

Published : May 6, 2021, 6:50 AM IST

मुंबई - सध्या लॉकडाऊन सुरू असून कधीही नॅशनल लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात बहुतांशी नागरिक घरीच बसून आहेत. अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असले तरी विरंगुळा आणि मनोरंजनासाठी काही ना काही पाहिजेच असते. 'फक्त मराठी वाहिनी'ने लॉकडाऊनच्या अवघड काळातही प्रेक्षकांच्या शंभरटक्के मनोरंजनासाठी कंबर कसली आहे. संपूर्ण मे महिन्यामध्ये दररोज एक सुपरहिट चित्रपट तसेच 'साईबाबा श्रद्धा सबुरी' आणि 'सप्तपदी' या लोकप्रिय मालिका 'फक्त मराठी वाहिनी'वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

‘फक्त मराठी वाहिनी’ने आणला सुपरहिट मराठी चित्रपटांचा खजिना -

फक्त मराठी वाहिनीच्या लॉकडाऊन स्पेशल महोत्सवामध्ये प्रेक्षकांसाठी 'फर्जंद', 'तुकाराम', 'दगडी चाळ', 'मोरया', 'शहाणपण देगा देवा', 'राजवाडे आणि सन्स', 'वाय झेड', 'सतरंगी रे', ‘तुझं तू माझं मी’(TTMM) 'कॉफी आणि बरंच काही', ‘इश्क वाला लव्ह’, ‘तुझ्याविन मर जावा’, 'देवा', 'संदूक', 'मस्का', 'गणवेश', 'गाभ्रीचा पाऊस', 'खेळ मांडला', ‘मंकी बात’, ‘हॉस्टेल डेज’, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘जन्मदाता’, ‘पसंत आहे मुलगी’, 'तू तिथं मी', 'कळत नकळत', ‘बंदिवान मी या संसारी’, ‘भेट’, ‘सर्वसाक्षी’, सामना’ इत्यादी दर्जेदार सुपरहिट चित्रपटांचा भरगच्च गुलदस्ताच पेश करण्यात येत आहे.

फक्त मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या एकापेक्षा एक सरस सुपरहिट चित्रपटांबाबत 'फक्त मराठी वाहिनी'चे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले, ‘लॉकडाऊन मुळे सगळ्यांना घरात रहावं लागतं आहे. सर्वांवर विशिष्ट ताण आहे. निरोगी अरोग्यासोबतच मानसिक संतुलन राखण्याचीही या काळात सर्वांना गरज आहे. ही गरज दर्जेदार मनोरंजनातून पूर्ण होऊ शकते. म्हणून आमच्या वाहिनीने सर्वांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या सुपरहिट चित्रपटांची बँक प्रेक्षकांसाठी खुली करण्याचे ठरविले आहे. वाहिनीवर दररोज एका सुपरहिट चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी बाहेर न पडता, घरात राहून आपल्या आवडत्या चित्रपटांसोबतच 'साईबाबा श्रद्धा सबुरी', 'सप्तपदी' या मालिका पाहून आपलं टेन्शन घालवावं हा वहिनीचा उद्देश आहे. आम्ही मे महिन्यासाठी जवळपास ३० हून अधिक सुपरहिट चित्रपटांची निवड केली आहे, जे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा गाजलेले आहेत.’

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details