नागपूर - येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला वादाचं गालबोट लागन्याची शक्यता आहे. या नाट्य संमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगर शाखेला डावलल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे मान सन्मानावरुन नाट्यसंमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात वादाची ठिणगी - नागपूर
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात वादाची ठिणगी. समेलनादरम्यान विरोध करण्याचा नागपूर महानगर शाखेचा इशारा. उद्यापासून नागपूरात नाट्य संमेलन.
![अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात वादाची ठिणगी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2507012-199-452a7851-e790-4617-9776-7e71ace5ae3e.jpg)
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
आयोजनाच्या समित्या ठरविताना सन्मानजनक वागणूक दिली नाही आणि समितीचे अध्यक्ष म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार दिले नाहीत त्यामुळे आम्ही संमेलनादरम्यान घटनात्मक विरोध करण्याचा ईशारा परिषदेच्या नागपूर महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी दिली.
Last Updated : Feb 21, 2019, 4:09 PM IST