महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे आहेत 'जस्ट फ्रेंड'! - गौरी पटवर्धन

फक्त 'जस्ट फ्रेंड' असल्याची कबुली देण्यासाठी लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे या सुपर रोमँटिक जोडीने 'स्टोरीटेल मराठी' (Storytel Marathi)ची निवड केली आहे. 'जस्ट फ्रेंड' असताना एकमेकांसोबत कसं रहावं, आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात, हे त्यांनी प्रख्यात लेखिका सायली केदार (Author Sayali Kedar) आणि गौरी पटवर्धन (Gauri Patwardhan)यांच्या कथेतून मांडले आहे. त्यांच्या प्रेमाचा हा सुपर रोमँटिक चकटदार, खुसखुशीत ऑडिओ ड्रामा स्टोरीटेल मराठीने आपल्या ऑडिओबुकमध्ये रेकॉर्ड केला आहे.

ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे आहेत 'जस्ट फ्रेंड'!
ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे आहेत 'जस्ट फ्रेंड'!

By

Published : Nov 18, 2021, 7:58 PM IST

'जस्ट फ्रेंड' या नव्याकोऱ्या ऑडिओ ड्रामाच्या ('Just Friend' audio drama) निमित्ताने सर्वांना वेड लावणारी ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) व गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) ही क्युट बबली जोडी एकत्र आली आहे. आम्ही फक्त 'जस्ट फ्रेंड' असल्याची कबुली देण्यासाठी लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे या सुपर रोमँटिक जोडीने 'स्टोरीटेल मराठी' (Storytel Marathi)ची निवड केली आहे. 'जस्ट फ्रेंड' असताना एकमेकांसोबत कसं रहावं, आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात, हे त्यांनी प्रख्यात लेखिका सायली केदार (Author Sayali Kedar) आणि गौरी पटवर्धन (Gauri Patwardhan)यांच्या कथेतून मांडले आहे. त्यांच्या प्रेमाचा हा सुपर रोमँटिक चकटदार, खुसखुशीत ऑडिओ ड्रामा स्टोरीटेल मराठीने आपल्या ऑडिओबुकमध्ये रेकॉर्ड केला आहे.

ललित प्रभाकर आणि गौतमी देशपांडे यांनी आपल्या लालित्यपूर्ण वाचिक अभिनयातून 'जस्ट फ्रेंड'चा सुपर रोमँटिक ऑडिओ-ड्रामा अधिकच लज्जतदार, मजेशीर आणि उत्कंठावर्धक केला आहे. मैत्री, मैत्रीतलं नातं, त्यांच्यातील रुसवे-फुगवे, प्रेम आणि प्रेमातील तरलता, त्यासोबत असलेली डिपेन्डन्सी अश्या अनेक प्रेमळ नाजूक क्षणांचे सूक्ष्म निरीक्षण करून या व्यक्तिरेखा खुलविण्यासाठी या जोडगोळीने विशेष मेहेनत घेतली आहे. आदिती आणि चिराग या प्रमुख पात्रांचं सादरीकरण करताना ललित आणि गौतमी यांच्यातील उत्कठ बॉंडिंग दिसून येते. या दोन्ही व्यक्तिरेखा ते पुरेपूर जगले आहेत असे 'जस्ट फ्रेंड' स्टोरीटेलवर ऐकताना जाणवत राहते.

ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे आहेत 'जस्ट फ्रेंड'!

आदिती आणि चिराग अगदी बेस्ट फ्रेंड्स. अदितीच्या भाषेत अगदी Made for each other पण only as friends! आदितीला कुठलाही प्रॉब्लेम आला की चिरागची आठवण येते आणि चिराग तर आदितीच्या मेसेज शिवाय डोळेच उघडत नाही. दोघांच्या मैत्रीत इतका मोकळपणा की अगदी डेटिंग ऍपवरच्या मुलाला कुठे भेटू हे विचारायलासुद्धा आदितीला चिराग लागतो. चिराग कधी कशामुळे चिडला असेल आणि त्यातून त्याला कसं मनवायचं हेही तिला आपोआप कळतं. एकमेकांवाचून ते जगूच शकत नाहीत. पण मग, खरंच हे इतके अनुरूप असताना आदिती चिरागला सोडून डेटिंग ऍपवरुन मुलं का शोधतेय आणि आदितीला जसा चिराग फक्त ‘as a friend’ हवाय तसंच चिरागचं नक्की अहे नं? या गोष्टीत त्या दोघांमधली मैत्री पावसाच्या साथीने घट्ट तर होत जाते, पण त्यांच्यातलं नातं मैत्रीच्या एक पाऊल पुढे जाईल का?

स्वतंत्रपणे लिखाण करणाऱ्या या दोन प्रतिभावंत लेखिका 'जस्ट फ्रेंड' नव्या ऑडिओ सिरीज निमित्तानं प्रथमच एकत्र आल्याने एक अभिनव कलाकृतीची निर्मिती झाली आहे. सर्वांचे कुतूहल जागवत असलेला 'जस्ट फ्रेंड' हा ऑडिओ ड्रामा आपल्याला घरबसल्या, प्रवासात किंवा इतर कुठेही असताना, आपल्या मर्जीनुसार हवे तेव्हा 'स्टोरीटेल'वर ऐकता येणार आहे.

हेही वाचा - Kangana Ranaut Against Complaint : कंगना रणौतच्या विरोधात बिहारमध्ये तक्रार दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details