मुंबई- कॉमेडियन कुणाल कामराचा एक चाहता वर्ग आहे. त्याच्या प्रत्येक कृतीला त्यांचे समर्थन असते. कंगना रणौतच्या ट्विटरवर बंदी घातल्यानंतर कुणालने केलेले ट्विट सध्या व्हायरल झाले आहे यात कंगनाची खिल्ली उडवण्यात आली आहे.
अलिकडे पश्चिम बंगालच्या निवडणूकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर त्याचे सर्वाधिक दुःख कंगना रणौतला झाले असल्याचे तिच्या सोशल मीडियावरुन दिसते. अशा वेळी व्यक्त होण्यासाठी ती नेहमी व्हिडिओ पोस्ट करीत असते. अशाच एका व्हिडिओचा वापर कुणालने पोस्टमध्ये केलाय.