मुंबई - 'कुमकुम भाग्य' या टीव्ही मालिकेत इंदू दासीची लोकप्रिय भूमिका साकारणारी अभिनेत्री झरीना रोशन खान यांचे वयाच्या 54 व्या वर्षी हृदयविकाराच्या कारणामुळे निधन झाले. झरीना यांच्या अचानक निधनाने दु:खी झालेल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
झरीना यांचे सह कलाकार शब्बीर अहलुवालियाने त्यांचे काही एकत्र फोटो पोस्ट केले होते. त्यांनी याला कॅप्शन दिले होते, "ये चांद सा रोशन चेहरा...।"