मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून देशभरातील विविध शहरांमध्ये आंदोलन सुरू आहे. सध्या या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. कलाविश्वातही कलाकार याबाबतचं आपलं मत स्पष्ट करत आहेत. अभिनेत्री क्रिती सेनॉन हिनेदेखील आपलं मत मांडलं आहे. हिंसाच सर्व गोष्टींचा मार्ग नाही, असे ती म्हणाली आहे.
'सध्या या विषयावर सर्वांनी विचारपूर्वक मतं मांडली पाहिजेत. या कायद्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शांततेने आंदोलन करणे, हा आपला अधिकारही आहे. मात्र, त्यांनी सरकारला आपला मुद्दा शांततेने सांगण्याचा प्रयत्न करावा, असे क्रितीने म्हटले आहे.
हेही वाचा -आमचा आवाज दाबण्यापेक्षा तो सरकारने ऐकावा, शबाना आझमींचं स्पष्ट मत
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने तीव्र रूप धारण केले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जही करण्यात येत आहे. अनेक कलाकारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, शबाना आझमी, फरहान अख्तर, मोहम्मब झिशान अयुब, परिनीती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा, दिग्दर्शक विशाल भारद्वाज, तिग्मांशू धुलिया, अनुराग कश्यप यांनी देखील याबाबत आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
हेही वाचा -आलियाने शेअर केला राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा फोटो, म्हणते 'विद्यार्थ्यांकडून शिका'