मुंबई - सोनी टीव्हीवर पुन्हा एकदा 'कौन बनेगा करोडपती' शो सुरू होत आहे. हजारो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आणि अनेकांची स्वप्ने सत्यात उतरणारा हा शो आता ११ व्या पर्वात पोहोचला आहे. याबद्दलची माहिती स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.
'कौन बनेगा करोडपती' शोसह अमिताभ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज
कौन बनेगा करोडपती शोचे ११ वे पर्व लवकरच सुरू होत आहे. याबद्दलची माहिती स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.
अमिताभ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर कौन बनेगा करोडपती शोची घोषणा केली आहे. यावर्षी २०१९ च्या नव्या अभियानाला सुरुवात होत असून लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.
अमिताभ यांनी शोच्या सेटवरील फोटो शेअर केला आहे. शोची तारीख लवकरच जाहीर होईल. आपल्या ज्ञानाच्या जोरावर नशिब बदलवण्याची संधी या शोमुळे प्रेक्षकांना मिळत असते. स्पर्धक बनण्यासाठी काही चाचण्या द्याव्या लागतात. याची सुरुवात आता होत आहे.