महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तुम्बांड'च्या अभिनेत्यासोबत पहिल्यादाच 'या' चित्रपटात झळकणार किर्ती कुल्हारी - digital media

दिग्दर्शक पवन कृपलानी यांचे दिग्दर्शन असलेल्या एका चित्रपटात दोघेही एकत्र येणार आहेत. अलिकडेच या दोघांनीही या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सोहम शाहने या चित्रपटाद्वारे डिजीटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली आहे.

'तुम्बांड'च्या अभिनेत्यासोबत पहिल्यादाच 'या' चित्रपटात झळकणार किर्ती कुल्हारी

By

Published : Jun 1, 2019, 12:41 PM IST

मुंबई - 'शिप ऑफ थिसीयस' आणि 'तुम्बाड'सारख्या चित्रपटात काम करणारा अभिनेता सोहम शाह लवकरच पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. 'उरी', 'पिंक', 'ब्लॅकमेल' आणि 'इंदु सरकार' यांसारख्या चित्रपटात दमदार भूमिका साकारणाऱ्या किर्ती कुल्हारीसोबत तो पहिल्यांदाच भूमिका साकारणार आहे.

दिग्दर्शक पवन कृपलानी यांचे दिग्दर्शन असलेल्या एका चित्रपटात दोघेही एकत्र येणार आहेत. अलिकडेच या दोघांनीही या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सोहम शाहने या चित्रपटाद्वारे डिजीटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली आहे. मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता तो डिजीटल विश्वातही भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. पवन कृ़पलानी यांचा हा चित्रपट एक शॉर्ट फिल्म असणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहिर करण्यात आली नाही.

सोहम शाहने शेअर केलेली पोस्ट

किर्ती कुल्हारीनेही डिजीटल विश्वात पदार्पण केले आहे. 'फोर मोर शॉर्ट्स' या वेब सीरिजमध्येही तिने बोल्ड भूमिका साकारली आहे. आता सोहम शाहसोबत ती पहिल्यांदा डिजीटल प्लॅटफॉर्मवर झळकणार असल्यामुळे त्यांच्या या आगामी शॉर्ट फिल्मची चाहत्यांना उत्सुकता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details