महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कीर्तनकार शिवलीला पाटील ‘या’ कारणासाठी गेल्या बिग बॉस मराठीच्या घराबाहेर! - Kirtankar Shivlila Patil went out of the house

कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील या बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्या आहेत. त्यांचा या विकेंडच्या निष्कासन प्रक्रियेत सहभाग होता आणि जर कमी मतं पडली असती तर त्यांना कायमचे घरी जावे लागले असते. परंतु काही वैद्यकीय कारणास्तव काही काळ त्या बिग बॉस मराठीच्या घराबाहेर असणार आहेत.

कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील
कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील

By

Published : Sep 30, 2021, 8:18 PM IST

बिग बॉस मराठी सिझन ३ चा सर्वत्र बोलबाला झाला आहे. दर आठवड्याला घरातील सदस्यांनी ‘नॉमिनेट’ केलेल्या सदस्यांपैकी एकाचा खेळ खलास होऊन तो सदस्य घर सोडून जातो. परंतु आता आठवड्याच्या मध्यावर कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील या बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्या आहेत. त्यांचा या विकेंडच्या निष्कासन प्रक्रियेत सहभाग होता आणि जर कमी मतं पडली असती तर त्यांना कायमचे घरी जावे लागले असते. परंतु काही वैद्यकीय कारणास्तव काही काळ त्या बिग बॉस मराठीच्या घराबाहेर असणार आहेत.

कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या बिग बॉस मराठी कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर रंगते आहे. कार्यक्रमाच्या या पर्वातील सदस्यांना देखील प्रेक्षकांचे भभरून प्रेम मिळते आहे. बिग बॉस हा कार्यक्रम आणि अनिश्चितता यांच खूप जवळच नातं आहे. या खेळात कधी काय घडेल हे कोणच सांगू शकत नाही. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावं गाजली आणि ती म्हणजे तृप्ती देसाई आणि शिवलीला बाळासाहेब पाटील. अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याचं दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित केले.

नुकतंच शिवलीला यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले की, “इथला प्रत्येक माणूस माझा असेल”. त्यांच्या या वाक्याने सदस्यांबरोबरचं प्रेक्षकांची मने देखील जिंकली. पण, शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली आणि आज बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद राहतील.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

हेही वाचा - आलिया भट्टच्या विरोधात सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details