मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी, गायक बादशाह आणि किरण खेर दिसत आहेत. हा व्हिडिओ 'इंडियाज गॉट टॅलेंट' या टॅलेंट शोच्या पडद्यामागचा आहे. या व्हिडिओमध्ये किरण खेरने गायक बादशाहला खडसावले आहे. किरणने बादशाहच्या आईकडे तक्रार केल्याचेही बोलले आहे. किरणने दटावल्यानंतर बादशाह माफी मागताना दिसत आहे.
शिल्पा शेट्टी अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने एक अप्रतिम बीटीएस व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे खूप मनोरंजन केले आहे. इंडियाज गॉट टॅलेंटचे जज शिल्पा शेट्टी आणि किरण खेर शोचा तिसरा जज बादशाहची वाट पाहत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
शिल्पा शेट्टीला वाट पाहण्याचा राग येतो, त्यानंतर तिने किरण खेरला विचारले की आपण 15 मिनिटे कोणाची वाट पाहत आहोत ते सांगा. यावर किरण म्हणते की, नेहमीप्रमाणे बादशाहाची आणि कोणाची? त्यानंतर बादशाहाचे आगमन होते, पण प्रकरण इथेच संपत नाही.