झी मराठीवरील 'देवमाणूस' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. त्यामुळे त्यांचा भेटीला आला ‘देवमाणूस २’. या मालिकेतील रंजक वळणं पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नाहीयेत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक होतंय. ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे.
‘देवमाणूस २’ मधील एक धक्कादायक सीन शूट करताना भेदरला किरण गायकवाड! - देवमाणूस २ मालिकेत किरण गायकवाड
'देवमाणूस' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. त्यामुळे त्यांचा भेटीला आला ‘देवमाणूस २’. या मालिकेतील रंजक वळणं पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नाहीयेत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक होतंय. ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे.

मालिकेत डॉक्टरला नीलमच्या रूपात नवीन सावज मिळालं आहे. डॉक्टरला नवीन सावज मिळाल्यावर त्याच्यासोबत काय होतं याचा अंदाज प्रेक्षकांना तर आहेच पण नवनवीन ट्विस्ट दाखवून ही मालिका प्रेक्षकांना थक्क करते. तसेच किरण गायकवाडचा सहज अभिनय या मालिकेतील देवमाणसाचा प्रभाव प्रेक्षकांवर कायम ठेवतो. पण नुकतंच मालिकेतील एक प्रसंग शूट करताना किरणला धक्का बसला. त्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक गंभीर असलेला फोटो शेअर करत म्हटलं आहे, "वाटलं नव्हतं की देवमाणूस शूट करताना असा काही सिक्वेन्स शूट करावा लागेल".
‘देवमाणूस २’ या मालिकेतील अनेक प्रसंग प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देत असतात. परंतु अभिनेता किरण गायकवाड याने एक असा सीन शूट केलाय ज्याने तोदेखील हादरलाय. एक कठीण प्रसंग किरणने चित्रित केला आहे ज्यामुळे त्याला धक्का बसला आहे. त्याबद्दल तो सोशल मीडियावर व्यक्तही झालाय. मालिकेचे चाहते आणि रसिक प्रेक्षक हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की नक्की कोणत्या प्रकारचा प्रसंग चित्रित केला गेला आहे जो इतका भयानक आहे. नेटिझन्स त्याबद्दल अनेक तर्कवितर्क करत असून कॉमेंट सेक्शनमध्ये मेसेजेस चा पाऊस पडत आहे. आता ही मालिका आणखी कुठल्या रंजक वळणावर जाणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं आहे.
हेही वाचा -Producer Lodged Complaint Against Aditya Pancholi : आदित्य पांचोलीने केली मारहाण आणि शिवीगाळ; निर्मात्याचा आरोप