मुंबई - अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या 'कबीर सिंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती शाहिद कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कियाराने 'लस्ट स्टोरीज', 'एम.एस. धोनी' आणि 'कलंक' चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली. आता तिच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. 'कबीर सिंग' या चित्रपटानंतर आणखी एका चित्रपटासाठी ती सज्ज झाली आहे.
'कबीर सिंग' चित्रपटानंतर 'या' चित्रपटात झळकणार कियारा आडवाणी - kalank
कियाराने 'लस्ट स्टोरीज', 'एम.एस. धोनी' आणि 'कलंक' चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली. आता तिच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. 'कबीर सिंग' या चित्रपटानंतर आणखी एका चित्रपटासाठी ती सज्ज झाली आहे.
'इंदु की जवानी' असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात होईल. बंगाली पटकथालेखक अबीर सेनगुप्ता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांचा हा पहिलाच बॉलिवूड दिग्दर्शनीय चित्रपट आहे. मोनीषा आडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल आडवाणी हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर, निरांजन अय्यंगार आणि रेयान स्टेफन हे सहाय्यक निर्माते आहेत.
चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी कियाराचा या चित्रपटाच्या टीमसोबत एक फोटो शेअर केला आहे. कियारानेही तिच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या चित्रपटासाठी खूप उत्साही असल्याचे तिने या ट्विटमधुन म्हटले आहे.