महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

''करणला वाटत होतं की, नेटफ्लिक्सवर फिल्म करण्यासाठी मी घाबरेन'' - Karan Johar latest news

वेब सिरीजची पोच लक्षात घेता नेटफ्लिक्सवर परतण्यात कियारा अडवणीची कोणतीच अडचण नव्हती. खरंतर करण जोहरला असे वाटत होते की हे काम करण्यास ती घाबरेल.

Kiara Adawani
कियारा अडवाणी

By

Published : Feb 19, 2020, 1:46 PM IST

मंबई - कियारा अडवाणी 'गिल्टी' या वेबसिरीजमधून पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर परतली आहे. 'लस्ट स्टोरीज'नंतर तिची ही दुसरी सिरीज रिलीज होईल. निर्माता करण जोहरला वाटत होते की ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणखी एक प्रोजेक्ट करायला ती माघार घेईल.

कियाराने २०१४ मध्ये 'फगली'मधून केला होता. परंतु तिला २०१८ मध्ये आलेल्या करण जोहरच्या मिनी सिरीयलमुळे प्रसिध्दी मिळाली होती.

कियारा अडवाणी

कियारा म्हणाली, ''मी कार मध्ये होते आणि करण जोहर म्हणाले की मी एक नरेशन ऐकले आहे आणि खूप चांगला रोल आहे. त्यांच्या मते ती खूप थ्रिलिंग स्क्रिप्ट होती. ते म्हणाले की तू एकदा ऐक आणि पुढे म्हणाले नेटफ्लिक्ससाठी आहे.''

कियारा पुढे म्हणाली, ''त्यांनी विचार केला असेल की 'कबीर सिंग' आणि 'गुड न्यूज'सारख्या सिनेमातून मी भूमिका केल्या आहेत. परंतु माझ्या डोक्यात प्लॅटफॉर्म महत्त्वाचा नाही तर कंटेंट महत्त्वाचा आहे.''

कियाराने वेब सिरीजची पोच पाहिलेली आहे. ती म्हणाली की या मेडियममध्ये परतण्यास तिची कोणतीच हरकत नव्हती.

रुची नारायण दिग्दर्शित 'गिल्टी' मध्ये एका छोट्य़ा शहरातील मुलगी कॉलेजातील स्टार रॅपरवर रेपचा आरोप लावते आणि याचे सत्य वेगवेगळ्या रुपात समोर येते.

कनिका ढिल्लो आणि अतिका चौहान यांनी लिहिलेली 'गिल्टी' ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर ६ मार्चला स्ट्रीमिंग होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details