मुंबई- मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने तिचे इंस्टाग्राम हँडल सार्वजनिक केले आहे. या बरोबरच दिवंगत सुपरस्टार श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरनेसुद्धा तिचे इंस्टा प्रोफाइल सार्वजनिक केले आहे आणि जगाला त्यांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी दिली आहे.
बिग बीची नात नव्या नवेली तिच्या लीक होणाऱ्या फोटोमुळे आणि अभिनेता मिझान जाफरीसोबत असलेल्या तथाकथित नात्यामुळे चर्चेत असते. ती सिनेमांमध्ये नसली तरी सोशल मीडियावर नव्याचे खूप फॅन फॉलोइंग आहे. तिचा प्रोफाईल सार्वजनिक होण्यापूर्वी तिच्या उत्साही चाहत्यांनी त्यांचे इन्स्टा पेज तिच्यासाठी समर्पित केले होते.
२४ ऑगस्ट २०१७ रोजी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्ममध्ये सक्रिय झालेल्या नव्या नवेलीने आतापर्यंत 86 हजार अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत आणि ही संख्या आणखी मोठे होणार आहे. नव्याने साइटवर शेअर केलेला पहिला फोटो तिचे वडील निखिल नंदा यांचा होता.
जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशीचेही इन्स्टाग्राम प्रोफाइल सार्वजनिक झाले आहे. २०१५ मध्ये तिने इन्स्टाग्रामवर खासगी पदार्पण केले होते. तिच्या मित्रांसोबतच्या फोटोपासून ते आई श्रीदेवीबरोबर यापूर्वी कधीही न पाहिलेल्या क्षणांपर्यंतचे खुशीचे प्रोफाइल ग्लॅमरस होते.