महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

खतरों के खिलाडी 11: अर्जुन बिजलानीने शो जिंकला, मुलाला समर्पित केली ट्रॉफी - 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी'चा अकरावा सीझन

अभिनेता अर्जुन बिजलानीने स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी'चा अकरावा सीझन जिंकला आहे. याचे संपूर्ण शूटिंग काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाले होते. सहकारी कलाकार दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी, विशाल आदित्य सिंग, गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेता वरुण सूद यांच्यासह तो पहिल्या सहा फायनलिस्टमध्ये होता.

खतरों के खिलाडी 11: अर्जुन बिजलानीने शो जिंकला
खतरों के खिलाडी 11: अर्जुन बिजलानीने शो जिंकला

By

Published : Sep 27, 2021, 3:02 PM IST

मुंबई- अर्जुन बिजलानीला रविवारी अॅडव्हेंचर-रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'चा विजेता म्हणून घोषित करण्यात आले. आपला 5 वर्षाचा मुलगा अयान याच्यासाठी ही स्पर्धाची जिंकण्याची त्याची इच्छा होती. अर्जुनने कलर्स वाहिनीच्या या शोच्या 11 व्या सिझनमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेचे शुटिंग दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये पार पडले होते. बॉलिवूडचा निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टीने या शोला होस्ट केले होते.

शो जिंकावा अशी मुलाची होती इच्छा

"शो जिंकल्यावर खूप छान वाटतं. केप टाऊनमध्ये हा एक लांबचा प्रवास होता. जेव्हा रोहित सरांनी माझ्या नावाची घोषणा केली तेव्हा मला खूप आनंद झाला. मला खरोखर अयानसाठी ही स्पर्धा जिंकण्याची इच्छा होती. त्याने मला सांगितलं होतं की मी ही ट्रॉफी जिंकावी अशी त्याची इच्छा आहे. मुलासाठी ही एक मोठी गोष्ट आहे, " असे 38 वर्षीय अभिनेता अर्जुन बिजलानी म्हणाला.

सहकारी कलाकार दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी, विशाल आदित्य सिंग, गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेता वरुण सूद यांच्यासह तो पहिल्या सहा फायनलिस्टमध्ये होता.

अर्जुन बिजलानी याने नागिन, मेरी आशिकी तुम से ही, मिले जब हम तुम आणि लेफ्ट राईट लेफ्ट अशा लोकप्रिय शोमध्ये काम केले आहे. नवीन सिझनसाठी त्याची जेव्हा निवड झाली तेव्हा त्याच्या मनात खूप शंका होत्या. मात्र यावर साहसाने त्याने मात केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा संधी मिळाली

अर्जुन बिजलानी म्हणाला की, गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसच्या महामारीने सागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे शूटिंगपासून बराच काळ थांबल्यानंतर प्रेक्षकांसमोर येण्याची ही नामी संधी होती.

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये पार पडले शुटिंग

खतरों के खिलाडीचे शुटिंग केप टाऊनमध्ये कडक कोविड -19 सुरक्षा प्रोटोकॉल पाळत पार पडले. सलग 42 दिवस हे स्टंट अॅक्शन शूट सुरू होते.

"मला माहीत होतं की हा शो अभिनेता म्हणून मलाही उपयुक्त ठरेल. हा शो लहान मुलांमध्येही लोकप्रिय आहे. साथीच्या (लॉकडाऊन) नंतर अशाप्रकारे चाहत्यांशी संपर्क साधण्याची ही एक उत्तम संधी होती. मला शोसाठी हो म्हणायची अनेक कारणे होती, " असे तो पुढे म्हणाला.

हेही वाचा - परिणीतीने पोस्ट केला मालदिवचा 'सनबर्न्ट' फोटो, प्रियकांची खोचक कॉमेंट

ABOUT THE AUTHOR

...view details