महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेत गौरव अमलानी साकारणार खंडेराव होळकर! - ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिका सोनी मराठीवर

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेने अलीकडेच सात वर्षांची झेप घेतली आहे आणि आता या मालिकेत युवा अध्यायाचा प्रारंभ झाला आहे. या मालिकेतून अहिल्याबाई होळकर या महान स्त्रीची प्रेरणादायक आणि भव्य गाथा सांगितली जात आहे. अहिल्याचा पती खांडेरव होळकर याचे युवावस्थेतील भूमिका साकारण्यासाठी अभिनेता गौरव अमलानी याची आता या मालिकेत एन्ट्री झाली आहे.

गौरव अमलानी
गौरव अमलानी

By

Published : Sep 14, 2021, 9:01 PM IST

गेले काही महिने प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्यास खिळवून ठेवणार्‍या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेने अलीकडेच सात वर्षांची झेप घेतली आहे आणि आता या मालिकेत युवा अध्यायाचा प्रारंभ झाला आहे. या मालिकेतून अहिल्याबाई होळकर या महान स्त्रीची प्रेरणादायक आणि भव्य गाथा सांगितली जात आहे. १८ व्या शतकात अनिष्ट सामाजिक रुढींना आव्हान देऊन, जाचक बंधने झुगारून स्त्री-सक्षमीकरणाच्या नव्या युगाचा मार्ग सुकर करणार्‍या अहिल्याबाई होळकर या मालिकेच्या केंद्रस्थानी आहेत.

अहिल्याचा पती खांडेरव होळकर याचे युवावस्थेतील भूमिका साकारण्यासाठी अभिनेता गौरव अमलानी याची आता या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ही महत्त्वाची भूमिका साकारण्याबद्दल गौरव अमलानी म्हणाला, “व्यक्तिशः मला ऐतिहासिक मालिका आवडतात कारण त्यातून अशा प्रेरणादायक कथा लोकांपुढे मांडलेल्या असतात आणि प्रेक्षकांना त्यातून बरेच काही शिकायला मिळते. अहिल्याबाईंची गाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे आणि ही कहाणी सांगण्यासाठी भूमिका निभावणे हे माझ्यासाठी जितके रोमांचक आहे, तितकेच आव्हानात्मकही आहे. हा रोमांचक अनुभव घेण्यास मी उत्सुक आहे. खंडेराव होळकर ही भूमिका करण्याची मोठीच संधी मला मिळाली आहे. मी स्वतः या मालिकेचा मोठा चाहता आहे त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. अशा मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करत असल्यामुळे मला स्वतःकडून सर्वोत्कृष्ट योगदान देण्यासाठी प्रोत्साहन मिळते.”

गौरव अमलानी

सध्याच्या कथानकात अशा एका सामाजिक मुद्द्याला हात घातलेला आहे, जो आजही समाजात दिसून येतो, तो म्हणजे छळणूक. अहिल्येच्या दूरच्या नात्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीवर गावातील एका महिलेचा छळ केल्याचा आरोप येतो, तेव्हा त्याच्याविरुद्ध उभे ठाकून त्याला योग्य शासन देण्याचे अहिल्या ठरवते. पण, या बद्दल दरबारात तिचा खूप विरोध होतो, विशेषतः तिच्या आप्तेष्टांकडून. अहिल्या शासन करण्यास असमर्थ आहे असा सूर उमटत असतानाच मल्हारराव मात्र अहिल्येच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देतात.

लहानपणीची अहिल्याबाई आणि खंडेराव यांच्या भूमिका करणार्‍या अदिती जलतारे आणि क्रिश चौहानबद्दल गौरव अमलानी म्हणाला, “या मालिकेत अहिल्याबाई आणि खंडेराव यांच्या भूमिका करताना अदिती आणि क्रिश या दोघांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. यापुढे त्या भूमिका करणे हे इतर कुणासाठीही आव्हानात्मक असणार आहे, कारण प्रेक्षक कलाकारांमध्ये गुंतून जातात. मला आशा आहे की, एतशा आणि मी चांगली कामगिरी करून प्रेक्षकांचे मन जिंकू शकू.”

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होते.

हेही वाचा - निखिल आडवाणी झालेत खूश, कारण, 'मुंबई डायरीज 26/11'ला मिळतोय प्रेक्षकांचा ‘पूश’!

ABOUT THE AUTHOR

...view details