मुंबई - कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आज इतिहास घडू शकतो. केबीसीच्या ११ व्या पर्वातील आजच्या भागाची सुरूवातच १ कोटीच्या प्रश्नापासून होणार आहे. १९ वर्षाचा युवक मंगळवारच्या भागात हॉट सीटवर पोहोचला. त्याने जबरदस्त खेळी करीत ५० लाखाच्या प्रश्नाचे उत्तर दिलंय. मात्र वेळेअभावी काल खेळ थांबवावा लागला होता.
केबीसीच्या या पर्वात एक कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचणारा हिमांशु हा पहिलाच पुरुष स्पर्धक आहे. यापूर्वी एका महिलेला हा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र तिला प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्यामुळे तिने खेळ सोडला होता. या पार्श्वभूमीवर हिंमाशु एक कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देणार का हे आजच्या भागात कळेल.