मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे एकेकाळी रिलेशनशीपमध्ये होते. तब्बल ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतरही त्यांच्यात चांगली मैत्री आहे. दोघांनीही त्यानंतर आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केले. मात्र, अलिकडेच एका कार्यक्रमात कॅटरिनाने रणबीरबाबत एक खुलासा केला आहे.
कॅटरिना बऱ्याचदा सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तर ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मात्र, २०१२ साली तिने पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केले होते. यामध्ये तिला रणबीरनेच मदत केली होती. त्यानेच तिला इन्स्टाग्राम कसे वापरावे, हे शिकवले होते. मात्र, रणबीरचे स्वत:चे इन्स्टाग्राम अकाऊंट बनावट असल्याचे तिने सांगितले.