मुंबई -बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन अलिकडेच 'लव्ह आज कल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानंतर तो आता 'भूल भुलैय्या २' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मागच्या वर्षीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तसेच कार्तिकचा फर्स्ट लुकदेखील समोर आला होता. आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो अक्षयने साकारलेल्या मांत्रिकाच्या लुकमध्ये पाहायला मिळतो. या अवतारात चेहऱ्यावरचे हास्य कमीच होत नाही, असे कार्तिकने या व्हिडिओवर कॅप्शन दिले आहे.
हेही वाचा -दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांचं ग्लॅमर