मुंबई- बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी डिजीटल दुनियेत पदार्पण केले आहे. या यादीत आता कार्तिक आर्यनचाही समावेश होणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी हिरा मंडी या वेब शोमधून कार्तिक पदार्पण करीत आहे.
संजय लीला भन्साळींच्या मेगा बजेट असलेल्या वेब सिरीजमध्ये कार्तिक आर्यन भाग घेत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. यापूर्वी भन्साळी यांनी प्रियंका चोप्राला घेऊन एक चित्रपट बनवण्याची तयारी सुरू केली होती. त्यांच्या या आगामी शोमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीही सहभागी होणार आहेत. तसेच विद्या बालनचीही निवड वेब सिरीजसाठी करण्यात आल्याची चर्चा मनोरंजन जगतात आहे.