मुंबई - आज २६ जुलै रोजी कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाले आहेत. भारताने १९९९ साली कारगिल युद्धात पाकिस्तानवर अविस्मरणीय विजय मिळवला होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये तब्बल ६० दिवस हे युद्ध सुरू होते. 'ऑपरेशन विजय' म्हणूनही या युद्धाला ओळखले जाते. अखेर २६ जुलैला भारताने पाकिस्तानला मात देत विजयश्री मिळवली होती. तेव्हापासून २६ जुलै हा दिवस 'कारगिल दिवस' म्हणून साजरा केला. या दिवसाचे स्मरण करत बॉलिवूड कलाकारांनीही वीर जवानांप्रती सोशल मीडियावर आदरांजली वाहिली आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आयुष्मान खुराना, विवेक ओबेरॉय, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर ट्विटच्या माध्यमातून कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमिताभ बच्चन -बिग बी यांनी आपल्या ट्विटमध्ये वीरजवानांप्रती आदर व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
अक्षय कुमार -अक्षयने देखील एक फोटो शेअर करुन वीर जवानांना आदरांजली वाहिली आहे. त्याने लिहिलेय, की 'मी सहसा पुस्तकं फार कमी वाचतो. मात्र, आज कारगिल विजय दिवसानिमित्त मी 'इंडियाज मोस्ट फिअरलेस २' हे पुस्तक वाचले. आपल्या देशाप्रती आपले प्राण पणाला लावणाऱ्या जवानांप्रती मी आदर व्यक्त करतो'.