महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

करणवीर बोहराने सांगितला 'द कॅसिनो'च्या शूटिंगवेळचा नेपाळमधील थरारक अनुभव - The Casino

'कबूल है' फेम अभिनेता करणवीर बोहरा नेपाळमध्ये ‘कॅसिनो’ या वेब सीरिजसाठीच्या शूटिंगसाठी गेला होता. त्याने येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील उत्कंठावर्धक अनुभव सांगितला आहे.

Karanvir Bohra recalls shooting in Nepa
'द कॅसिनो'च्या शूटिंगचा नेपाळमधील अनुभव

By

Published : Jun 3, 2020, 8:37 PM IST

मुंबई - 'द कॅसिनो' या चित्रपटाद्वारे डिजिटल डेब्यूसाठी करणवीर सज्ज झाला आहे. या कार्यक्रमाचे शूटिंग मुख्यत: मुंबईत झाले होते, तर काही भाग वर्षाच्या सुरुवातीला नेपाळमध्ये चित्रीत करण्यात आला होता. करणवीरला हे आऊट डोअर शूटिंग सर्वात सुंदर अनुभव होता असे वाटते.

नेपाळमधील शूटिंगच्या पद्धतीबद्दल बोलताना करणवीरने शेअर केले आहे, "आउटडोअर शूट्सचे स्वत: चे वेगळे आकर्षण आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला नेपाळमध्ये 'कॅसिनो'साठी शूटिंग करताना हा अनुभव आम्हाला मिळाला होता.

"तिथले लोक, ठिकाणे आणि स्थानिक खाद्यपदार्थ अर्थातच सर्वकाही खूप उबदार आणि स्वागतार्ह होते, ज्यामुळे तिथला आमच्या शूटिंगचा अनुभव अजूनच संस्मरणीय बनला. काठमांडूतील खूपच सुंदर शूटिंग झाले... त्यामुळे नयनरम्य आणि मोहक गोष्टींमुळे आमचा शूटिंगचा काळ प्रसन्न गेला.'', असे तो म्हणाला.

त्यापूर्वी चीनमध्ये कोविड -१९ ची भीती पसरली असूनही त्यांनी नेपाळमध्ये शूट करण्याचा निर्णय घेतला होता.

"नेपाळला रवाना होण्याच्या एक दिवस आधी आम्हाला चीनमध्ये कोविड -१९ ची भीतीदायक बातमी मिळाली आणि ते थोडे चिंतेत पडले होते. पण आम्ही तिथे जायला यशस्वी झालो, वेळेत शूट सुरु केले आणि मुंबईला परत गेलो. त्यानंतर आम्हाला कळलं की, त्या काळात हा विषाणू नेपाळमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे आम्ही तिथे शूटिंग अत्यंत वेळेत पूर्ण केले, परंतु आमच्यातील सर्व भीती पांघरुन हा सुंदर अनुभव घेतला.'', असेही तो म्हणाला.

आगामी 'द कॅसिनो' ही मालिका विक्की नावाच्या एका श्रीमंत परंतु नम्र मुलाची कथा आहे. तो आपल्या वडिलांच्या अब्जो डॉलर्सच्या कॅसिनोचा वारस आहे. उच्चभ्रू समाजातील गूढ आणि षड्यंत्रांचे एक जग उलगडण्यासाठीचा प्रवास यात पाहायला मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details