महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कलंक' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, 'या' दिवशी होणार रिलीज - sanjay dutt

'कलंक'मध्ये वरूण धवन, अलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि माधुरी दिक्षित अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. त्यांच्या भूमिकेवरूनही पडदा उठविण्यात आला आहे. चित्रपटाचा टीजरही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

कलंक

By

Published : Mar 9, 2019, 5:43 PM IST

मुंबई - करण जोहरची निर्मीती असलेल्या मल्टीस्टारर 'कलंक' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अलिकडेच या चित्रपटाचे वेगवेगळे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. हा चित्रपट १९ एप्रिलला प्रदर्शनासाठी सज्ज झाला होता. मात्र, प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहता प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.


'कलंक'मध्ये वरूण धवन, अलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि माधुरी दिक्षित अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. त्यांच्या भूमिकेवरूनही पडदा उठविण्यात आला आहे. चित्रपटाचा टीजरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आता १७ एप्रिल रोजी सिनेमागृहात झळकणार आहे. १७ एप्रिलला महावीर जयंती आहे. तसेच, १९ एप्रिल रोजी 'गुड फ्रायडे' आहे. त्यामुळे सुट्ट्यांचा या चित्रपटाला फायदा व्हावा, यासाठी ४ दिवसआधीच हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या चित्रपटाचा टीजर १२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details