महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कलंक' चित्रपटाची नवी झलक, टीजर उद्या होणार प्रदर्शित! - #Womenof Kalank

करण जोहरने या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उद्या म्हणजेच १२ मार्चला या चित्रपटाचा टीजरही प्रदर्शित होणार आहे.

'कलंक' चित्रपटाची नवी झलक

By

Published : Mar 11, 2019, 7:56 PM IST

मुंबई - दिग्दर्शक करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचे कथानक काय आहे, याबद्दलही प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. अशातच करण जोहरने या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उद्या म्हणजेच १२ मार्चला या चित्रपटाचा टीजरही प्रदर्शित होणार आहे.


'कलंक' चित्रपटात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. वरूण धवन, सिद्धार्थ रॉय कपूर, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, संजय दत्त हे सर्व या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. त्यांच्या भूमिकेवरुन आता पडदा उठत असताना, अभिनेत्रींचे खास लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच '#Womenof Kalank' असा हॅशटॅग वापरून आलिया भट्ट, माधुरी दीक्षित आणि सोनाक्षी सिन्हा यांचे खास लूक रिलीज करण्यात आले आहेत.


आलिया भट्ट या चित्रपटात 'रुप' नावाच्या राजकुमारीच्या भूमिकेत झळकणार आहे. माधुरी दीक्षित ही 'बहार बेगम' या भूमिकेत, तर सोनाक्षी सिन्हा ही 'सत्या चौधरी' या भूमिकेत झळकणार आहेत.
वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त यांचीही झलक या नव्या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय.


करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन हे करत आहेत. हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details